content.time.com |
पुढच्याच महिन्यात पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली मात्र लवकरच पुन्हा सोडून देण्यात आले. न्यायालयाने असे सांगितले की या दोघांपैकी एकजण नक्कीच गुन्हेगार आहे परंतु दिलेल्या पुराव्यांवरून कोण ते सांगता येऊ शकणार नाही. जुळ्या भावंडांची जनुके जवळपास ९९.९९% जुळतात आणि उरलेले अतिसुक्ष्म बदल वेगळे करणे जवळपास अशक्य असते कारण हे बदल शरिराच्या फक्त काही अवयवांपुरते मर्यादित असतात. एका न्यायवैद्यक तज्ञाच्या म्हणण्यानुसार, हे सूक्ष्म फरक ओळखायचेच असले तर या दोन भावांचे छोटे छोटे तुकडे करावे लागतील! त्याचप्रमाणे, कायद्यानुसार फक्त संशय आहे म्हणून एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी पकडून ठेवता येत नाही. त्यामुळे अशा खटल्यांमध्ये काही निकाल देणे जवळपास अशक्य होऊन बसते. बर्लिनच्या या खटल्यात यामुळे दुर्दैवाने या दोन्ही भावांना सोडून द्यावे लागले; या दोघांपैकी एक गुन्हेगार आहे हे नक्की माहित असूनदेखिल!
जुळ्यांमुळे निर्माण झालेल्या अशा गोंधळाचे हे काही एकमेव उदाहरण नाही. २०१४ मध्ये मलेशियामध्ये अशीच विचित्र स्थिती निर्माण झाली होती. सतिश राज आणि सबरिश राज या दोघा जुळ्या भावांपैकी एकाने अंमली पदार्थांची तस्करी केली असल्याचे स्पष्ट झाले होते. पण नेमकी कोणी ही तस्करी केली हे काही कळत नव्हते. न्यायाधीशाच्या म्हणण्यानुसार चुकीच्या व्यक्तिवर खटला चालवता येणार नाही आणि चुकीच्या व्यक्तिला शिक्षादेखिल करता येऊ शकत नाही. त्यामुळे या दोघांपैकी दोषी असणारा भाऊ थेट फाशीची शिक्षा होण्यापासून वाचला!
जुळ्यांच्या गुन्हेगारीची आणखीही बरीच उदाहरणे सापडतात. फ्रान्समधे २०१२ मध्ये एल्विन आणि योहान या जुळ्या भावंडांपैकी एकाने (की दोघांनिही?) तीन महिन्यांच्या कालावधीत सहा स्त्रियांवर बलात्कार केला आणि दोघांनीही आरोप नाकारल्यामुळे त्यांना सोडून द्यावे लागले. त्याचप्रमाणे ऑगस्ट २०१३ मध्ये ब्रिटनमधे मोहम्मद आणि आफताब या जुळ्या भावांना बलात्काराच्या गुन्हासाठी शिक्षा देता आली नाही. २००३ साली एका खटल्यामध्ये एका महिलेने जुळ्या भावांबरोबर केलेल्या (फक्त काही तासांच्या फरकाने) संबंधांमुळे ती गर्भवती राहीली. मात्र या दोन्ही भावांनी आपणच बाळाचे बाप असल्याचे नाकारले आणि दोघांचिही जनुके ९९.९% जुळत असल्याने याही खटल्याचा निकाल देता आला नाही.
मग याचा अर्थ असा आहे का की जुळ्या भावांना ओळखणे अगदी तत्वत: सुद्धा शक्य नाही? तर तसे नक्कीच नाहीये. २००८ साली अल्बामा विद्यापिठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की जुळ्या भावंडांची जनुके जवळपास सारखी असली तरी त्यांमधे असणारा अतिसुक्ष्म फरक शोधणे शक्य आहे. मात्र यासाठी लागणारा खर्च प्रचंड आहे. उदाहरणार्थ, वर उल्लेख केलेल्या फ्रान्सच्या खटल्यात पोलिसांना अशा प्रकारच्या चाचण्या करण्याचा खर्च चक्क ८५०,००० युरो (जवळपास ७ कोटी रुपये!) एवढा सांगण्यात आला होता! त्यामुळे सध्यातरी जुळ्यांनी अगदी विज्ञानालादेखिल वेड्यात काढले आहे हे नक्की! असे गुन्हेगार ओळखण्यासाठी तुम्हाला दुसरी एखादी युक्ती सुचली तर खाली प्रतिक्रिया लिहून मला नक्की कळवा.
Lol
ReplyDeleteHahaha.. How lucky they are.. :-P
ReplyDeleteRealy lucky....ha ha ha Dhoom 3
ReplyDelete:D
DeleteSomehow I forgot about Dhoom 3 while writing this article
narco test can be taken of the twins in all cases; except in the case of woman having affair with twins !
ReplyDeletemahesh k
Unfortunately those tests are not deterministic. So the results given them are something like "Probably this guy is lying". This cannot be used as evidence against anybody.
Delete'ए तावडे, ह्यान्ला आत घे अनि थर्ड डिग्री लाव, मग बघ कशे पटापटा बोलतील पोपटावानी'
ReplyDelete